Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Gadchiroli

विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या अंधारात लाकडाची वाहतूक? जंगलातून लाकूड तोडण्याचे आवाज; वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद नाही!

31 Oct 2026, 04:03 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या अंधारात लाकडाची वाहतूक? जंगलातून लाकूड तोडण्याचे आवाज; वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद नाही! - गडचिरोली, महाराष्ट्र

विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या अंधारात लाकडाची वाहतूक? जंगलातून लाकूड तोडण्याचे आवाज; वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही प्रतिसाद नाही!

वाघ आणि हत्तींच्या भीतीमुळे पत्रकारांना जंगलात जाऊन छायाचित्रे काढणे शक्य नाही; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने स्वतः घटनास्थळी पाहणी करावी. गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील विकसपल्ली–घोट मार्गावर रात्रीच्या वेळी ट्रक व टेम्पोमधून लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती समोर येत असून, या प्रकाराची अधिकृत माहिती वनविभागाला देण्यासाठी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, संबंधित वनअधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, घोट परिसरातील जंगलातून सायंकाळच्या सुमारास लाकूड तोडण्याचे आवाज ऐकू येत असल्याचे निदर्शनास आले.

या जंगल परिसरात वाघांचा वावर तसेच हत्तींच्या कळपाची भीती असल्यामुळे पत्रकारांनी स्वतः जंगलात प्रवेश करून छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढण्याचे धाडस केले नाही. स्वतःच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, या सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागाची मदत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वनअधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी सर्वप्रथम अहेरी तालुक्यातील वनरक्षक (Forester) प्रांजय वडेट्टीवार यांच्याकडे DFO/RFO यांचे संपर्क क्रमांक मागितले असता, त्यांनी नंतर देतो असे सांगितले. मात्र, त्यानंतर संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.

त्यानंतर वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर फोन करण्याचा प्रयत्न केला; परंतु फोन लागला नाही. अखेर दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी उपवनसंरक्षक (Sub-Divisional Forest Officer), आलापल्ली यांच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मेळेलवार यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

त्यांनी प्रथम पत्रकाराचे परिचयपत्र दाखविण्यास सांगितले. त्यानुसार WhatsApp द्वारे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर परिचयपत्र पाठविण्यात आले.

मात्र, त्यानंतरही आकाश मेळेलवार यांनी फोन उचलला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उपवनसंरक्षक, आलापल्ली यांच्या कार्यालयाकडून DCF आलापल्ली यांचा संपर्क क्रमांक मिळवून फोन करण्यात आला.

मात्र, तेथेही फोनला प्रतिसाद मिळाला नसल्याचा अनुभव आला. शेवटी एकच प्रश्न — जंगल वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन शासनाला माहिती दिली, तर त्या माहितीची दखल घेण्याची जबाबदारी कोणाची?

वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला असताना वनविभागाचे अधिकारीच संपर्काबाहेर राहिले, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे? वन वाचवा, वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा!

प्रसिद्धीसाठी : स्वतंत्र भारत पक्ष – शेतकरी संघटना
डॉ. पिंटू दयाल पाल

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

बड़ी खबर | आगरा में 14 वर्षीय नाबालिग के साथ कथित शोषण और जबरन बाल विवाह का गंभीर आरोप, सुरक्षा की गुहार लेकर थाने पहुंची बच्ची
A2Z सभी खबर सभी जिले की31 Oct

बड़ी खबर | आगरा में 14 वर्षीय नाबालिग के साथ कथित शोषण और जबरन बाल विवाह का गंभीर आरोप, सुरक्षा की गुहार लेकर थाने पहुंची बच्ची

# 🚨 बड़ी खबर | आगरा में 14 वर्षीय नाबालिग के साथ कथित शोषण और जबरन बाल विवाह…

पूरी खबर पढ़ें →
नई दिल्ली: इंदिरा गांधी की पुण्यतिथि पर कांग्रेस नेताओं ने दी भावभीनी श्रद्धांजलि
Etawah31 Oct

नई दिल्ली: इंदिरा गांधी की पुण्यतिथि पर कांग्रेस नेताओं ने दी भावभीनी श्रद्धांजलि

नई दिल्ली। देश की पूर्व प्रधानमंत्री एवं आयरन लेडी के नाम से प्रसिद्ध स्वर्गीय इंदिरा गांधी की पुण्यतिथि…

पूरी खबर पढ़ें →
सात दिवसीय रुद्राम्बिका महायज्ञ एवं श्रीमद्भागवत महापुराण ज्ञानयज्ञ का भव्य शुभारंभ
Hathras31 Oct

सात दिवसीय रुद्राम्बिका महायज्ञ एवं श्रीमद्भागवत महापुराण ज्ञानयज्ञ का भव्य शुभारंभ

धूमधाम के साथ निकाली गई भव्य कलश यात्रा हाथरस सिकंदराराऊ ।कासगंज रोड स्थित ग्राम नगला जलाल के श्री…

पूरी खबर पढ़ें →
ચોટીલા તળેટીમાં 40 ફૂટના મુખ્ય માર્ગ પરથી દબાણો દૂર કરાયા ડેપ્યુટી કલેક્ટર, મામલતદાર અને પોલીસની ટીમે JCBની મદદથી શેડ અને છાપરાં હટાવ્યાં
Surendranagar31 Oct

ચોટીલા તળેટીમાં 40 ફૂટના મુખ્ય માર્ગ પરથી દબાણો દૂર કરાયા ડેપ્યુટી કલેક્ટર, મામલતદાર અને પોલીસની ટીમે JCBની મદદથી શેડ અને છાપરાં હટાવ્યાં

ચોટીલા: ચોટીલા તળેટીથી શ્રી ચામુંડા માતાજીના મંદિર તરફ જતા આશરે 40 ફૂટના મુખ્ય માર્ગ પરથી ગેરકાયદે દબાણો દૂર…

पूरी खबर पढ़ें →
ਪੰਜਾਬ ਸੁਬਾਰਡੀਨੇਟ ਸਰਵਿਸਿਜ਼ ਫੈਡਰੇਸ਼ਨ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲੰਧਰ ਵਲੋਂ ਦਸੰਬਰ 2026 ਤੱਕ ਬਲਾਕ ਪੱਧਰੀ ਚੋਣਾਂ ਕਰਵਾਉਣ ਦਾ ਫੈਸਲਾ : ਬਾਸੀ
Jalandhar31 Oct

ਪੰਜਾਬ ਸੁਬਾਰਡੀਨੇਟ ਸਰਵਿਸਿਜ਼ ਫੈਡਰੇਸ਼ਨ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲੰਧਰ ਵਲੋਂ ਦਸੰਬਰ 2026 ਤੱਕ ਬਲਾਕ ਪੱਧਰੀ ਚੋਣਾਂ ਕਰਵਾਉਣ ਦਾ ਫੈਸਲਾ : ਬਾਸੀ

ਜਲੰਧਰ:31 ਅਕਤੂਬਰ ( ਪਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ) ਪੰਜਾਬ ਦੇ ਮੁਲਾਜ਼ਮਾਂ ਦੀ ਸਿਰਮੌਰ ਜਥੇਬੰਦੀ ਪੰਜਾਬ ਸੁਬਾਰਡੀਨੇਟ ਸਰਵਿਸਿਜ਼ ਫੈਡਰੇਸ਼ਨ ਦੀ ਫੈਡਰਲ…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!