A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र
Trending

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

अहिल्यानगर यांच्याकडून दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी शहरात अचानक नाकाबंदी व तपासणी मोहीम राबविण्यात आली.

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव व माहिती अधिकार कार्यकर्ते जामखेड.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अहिल्यानगर यांच्याकडून दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी शहरात अचानक नाकाबंदी व तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने प्रोफेसर चौक व मिस्त्रीबाग चौक परिसरात दुपारी १५.०० ते १७.०० वाजेपर्यंत तसेच सायंकाळी १७.१५ ते १९.०० वाजेपर्यंत राबविण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान १३९ संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही. तथापि, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले –
विना सीट बेल्ट – २०
काळी काच – ०३
मोबाईल वापर – ०४
हेल्मेटविना दुचाकी – १७
विना लायसन्स – ०९
विना नंबर प्लेट – १६
ड्रंक अँड ड्राईव्ह – ०२
एकूण ६८ केसेस नोंदवून ₹५०,०००/- (पन्नास हजार रुपये) इतका दंड वसूल करण्यात आला.
निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या तपासण्या व कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर

Back to top button
error: Content is protected !!