A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

टेपबॉल महिला क्रिकेटमध्ये ओडिषा विजेता तर मुंबई उपविजेता

संजय पारधी चंद्रपूर

बल्लारपूर :.महिलांची दुसरी राष्ट्रीय टेप बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 26, 27 ,28 ऑक्टोबर 2025 ला बल्लारपूर तालुका स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेमध्ये हरियाणा, नवी दिल्ली , जम्मू काश्मीर , तामिळनाडू , आसाम, ओडिषा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगाना आणि मुंबई अशा नऊ राज्यातील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य महिला टेपबॉल कौन्सिल यांनी केला, ज्यामध्ये महाराष्ट्र संघातील कर्णधार प्रीती निधेकर यांनी या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. बक्षीस वितरण सोहळ्याकरिता टेपबॉल कौन्सिल ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी वीरेंदर दहिया उपस्थित होते तसेच टेपबॉल कौन्सिल ऑफ इंडिया च्या व्हॉइस प्रेसिडेंट आणि सेकंड वुमन टेपबॉल नॅशनल चॅम्पियनशिप च्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी लक्ष्मी चैतन्य उपस्थित होत्या . उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ओडिशाच्या संगीताने प्राप्त केला तसेच उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मुंबईच्या प्रेरणाला मिळाला तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चा पुरस्कार नवी दिल्लीची अक्षताला मिळाला आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट चा पुरस्कार ओडिशाच्या सुनीताने पटकाविला. उपविजेता ठरलेल्या मुंबई संघाला सन्मानित करण्यात आले तसेच मुंबईचे कर्णधार वैशाली आवळे यांनी समाधान व्यक्त केले. प्रथम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या ओडिशा संघाच्या सर्व खेळाडूंना सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच ओडिशाची कर्णधार अंजू शाहू यांनी अशा प्रकारची स्पर्धा नियमित सुरू राहावी असा विश्वास व्यक्त केला. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेपबॉल क्रिकेट स्पर्धा श्रीलंका येथे होणार आहे त्याकरिता याच स्पर्धेतून भारताच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची निवड होणार आहे. सर्व मान्यवरांनी सर्व खेळाडूंना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!