
*तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिजाऊ ज्ञान मंदिरास प्रथम क्रमांक*
दि. 26 नोव्हेंबर
राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट येथील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पास माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला. तर भाषण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला.
सविस्तर वृत्त असे की, शिक्षण विभागाद्वारे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सैनिक स्कुल बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले होते. यात जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट येथील दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात वर्ग 6 ते 8 या गटात इयत्ता 6 वी चा विद्यार्थी मो. अयान मो. जावेद यांने सहभाग घेतला होता त्याच्या *”automatic vehicle charging by waste”* या प्रकल्पाला चौथा क्रमांक मिळाला तर वर्ग 9 ते 12 या गटात इयत्ता 10 वीचा विद्यार्थी तन्मय सुनिल काळे यांच्या *Rakshak scam detector* या ऑनलाईन स्कॅम ओळखणाऱ्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला व त्याच्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. तसेच मो. अयान मो. जावेद यास विज्ञान प्रदर्शनातील भाषण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला. दोन्हीही विजेत्यांना गटशिक्षणाधिकारी मा. मेमाने मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी टाकळकर मॅडम व इतर शिक्षण विभागातील मान्यवरांचे हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामुळे शाळेच्या शिरपेचात याही वर्षी मानाचा तुरा खोवला गेला आहे. मागील वर्षीही दोन्ही गटात जिजाऊ ज्ञान मंदिरच्या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला होता. तीच परंपरा शाळेच्या बाल वैज्ञानिकांनी कायम ठेवली आहे.
तसेच गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम आपल्या शिक्षण संकुलातून होत आहे. उद्याचे वैज्ञानिक घडवण्यात शाळा प्रयत्नशील आहे. आज गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी प्रथम क्रमांक मिळाला याचा आनंद आहे. या प्रकल्पाच्या निवडीबद्दल व मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा! असे गौरवोद्गार संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांनी व्यक्त केले. शाळेचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट व विज्ञान शिक्षक अविनाश शेळके यांनी मार्गदर्शन केले.
दि. 26 नोव्हेंबर






