

सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य असल्याचे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यापुढं राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत लावणं सक्तीचं असल्याचे भुसे म्हणाले. मराठी भाषा प्रत्येक शाळात शिकवणं सक्तीचं असल्याचे भुसे म्हणाले.
शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी अधिकारी सचिव करणार आहेत. 21 व्या शतकात ई माध्यमाचा विषयही आम्ही प्रभावीपणे राबवणार आहोत.
पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील काही निवडक चांगल्यबाबींचा शिक्षणात समावेश केला जाणार असल्याचे भुसे म्हणाले. याबाबतचं नियोजन हे पूर्ण झालेलं आहे. तत्पूर्वी शिक्षकांना त्याची ट्रेनिंग या चालू वर्षात दिली जाईल असे भुसे म्हणाले. पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील निवडक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल असे भुसे म्हणाले.





