
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या एनसीसी च्या 3 विद्यार्थ्यांची अग्निवीर म्हणून देशसेवा करण्याची संधी मिळाली आहे. यासंदर्भात अधिक माहितीनुसार महाविद्यालयातील तौसिफ़ शेख, साहिल सोनटक्के व संकेत सत्रे या 3 विद्यार्थ्याची भारतीय सैन्याच्या अग्निवीर मध्ये 2025 या वर्षात निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेशजी चिताडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, राष्ट्रीय छात्र सेनेचे ले. योगेश टेकाडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.











