अनिल खैरनार प्रतिनिधीभारत लाईव्ह टीव्ही न्यूज ठाणे
कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक विभाग आणि के. डी. एम. सी. यांनी मिळून शहरात वाहतूक सुरळीत व्हावी ह्या उद्देशाने गर्दी ठिकाणी गाड्या उभ्या असलेल्या व नो पार्किंग असलेल्या गाड्या ट्यूईंग करणे व वाहणांची रहदारी सुरळीत होणे करिता वार्डन यांची नेमणूक केली असतांना, नेमलेले वार्डन हे वाहन चालकांना अडवून अधिकार नसतांना त्यांना पेपर दाखवा,मोबाईल मध्ये फोटो काडून त्यांच्या जवळून पैसे उकाळणे पैसे नाही दिल्यास वाहन चालकांना धमाकावून वारंवार दंड आकरण्याचे कृत्य वार्डन करत आहेत, ट्यूईंग करणारी कर्मचारी हे वाहन उचलून नेतांना चालकांना मुळे बोली रक्कम घेऊनच वाहन सोडले जाते हे सर्व अधिकार नसतांना वाहतूक विभागचे अधिकारी पाठीशी घालत आहेत, यांच्या ह्या कृत्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. बहुतेक चालकांच्या तक्रारी असतांना वार्डन यांच्या बदल्या देखील करण्यात येत नसून ह्याबाबत वाहतूक शाखा भ्रष्टाचार करणाऱ्या सवयमसेवी वार्डन यांच्यावर कधी कारवाई करतील याची आपेक्षा वाहन चालक करत असल्याचे वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज च्या प्रतिनिधी बरोबर बोलताना मत वेक्त करत आहेत.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज ह्या सर्व वाहन चालकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लवकरच धडक मोहीम राबवून संबंधित दोषीवर कारवाई करण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानां करणार आहे.