चंद्रपूरमध्ये गुंडगिरीला थारा नाही! पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचा गुन्हेगारांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक!
५४ आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई; ९८ सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार
चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ५४ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, ९८ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला मोठा धक्का बसला असून, कायदा मोडणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.
अवैध धंदे, दहशत निर्माण करणारे गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध पोलिसांनी घेतलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पोलीस प्रशासनाचा स्पष्ट संदेश – चंद्रपूर जिल्ह्यात गुंडगिरी, दहशत आणि गुन्हेगारीला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.
गुन्हेगारीचा मार्ग सोडा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जा! या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर पोलिसांचा निर्धार स्पष्ट – कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही! Dr.Pintu paul