A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालयाचे बॉक्सर नागपूर विभागावर

 

संजय पारधी चंद्रपूर
भद्रावती :- महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग  स्पर्धा आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे पार पडल्या या स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील कु. दुर्गेश्वरी सतीश आत्राम व संकेत अरविंद वानखेडे या दोन खेळाडूंनी १९ वर्षाखालील मुला व मुलींच्या गटात दमदार कामगिरी करत विजय मिळविला व नागपूर विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित करीत विवेकानंद महाविद्यालयाचे नाव भद्रातीच्या शिरोपेच्यात मानाचा तुरा रोवला.
दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विजय झाल्यानंतर दुर्गेश्वरी व संकेत यानंतर होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागस्तरावर करणार आहे. खळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांना दिले. नागपूर विभागावर निवड झाल्याबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. डॉ. घुमे, प्रा. डॉ. सावे, प्रा. डॉ. तेलंग, प्रा. डॉ. खामनकर, प्रा. डॉ. काकडे, प्रा. ठाकरे, प्रा. लांबट, प्रा. कापगते,सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.💐💐💐

Back to top button
error: Content is protected !!