A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

संविधान व प्रजासत्ताक मूल्यांचा जागर, चंद्रपूरमध्ये 540 विद्यार्थ्यांचे भव्य कवायत संचलन

समीर वानखेड़े ब्यूरो चीफ:
भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली असून हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आल्याने 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये, संस्कृती व इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, शिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या अंतर्गत देशभक्तीपर गीतांवर आधारित शालेय विद्यार्थ्यांचा कवायत संचलन कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात आला. जिल्हा पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात 540 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर भव्य कवायत संचलन केले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या सुमारे 2500 शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शहरातील निवडक 9 शाळांमधील 540 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर प्रभावी कवायत संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कवायतीसाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांनी नोडल ऑफिसर म्हणून तर शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा पिपरे व संजय हेडाऊ यांनी सहायक नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडली. कवायतीचे नेतृत्व एन. सी. सी. ऑफिसर मोरेश्वर बारसागडे यांनी केले. तसेच प्रदीप कळसकर, सुनील माहुरे व साहिल चहारे यांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण कवायत सादर केली.

सहभागी झालेल्या शाळा : चंद्रपूर येथील हिंदी सिटी हायस्कूल (60 विद्यार्थी), भवानजीभाई चव्हाण हायस्कूल (60 विद्यार्थी), लोकमान्य टिळक कन्या विद्यालय (60 विद्यार्थी), लोकमान्य टिळक विद्यालय (60 विद्यार्थी), बी.जे.एम. कार्मेल कॉन्व्हेंट (90 विद्यार्थी), मातोश्री विद्यालय (60 विद्यार्थी), विद्याविहार कॉन्व्हेंट (60 विद्यार्थी), प्रियदर्शनी कन्या विद्यालय (30 विद्यार्थी) आणि छोटूभाई पटेल हायस्कुल (60 विद्यार्थी) यांचा समावेश होता.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!