
📰 प्रेस नोट
📍 जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये माहिती फलक नसल्याबाबत तहसीलदारांना ई-मेलद्वारे निवेदन
जामखेड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 (NFSA) तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पारदर्शकता नियमांनुसार प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्याचे दर, उपलब्ध साठा, वितरण तारीख, लाभार्थी माहिती आणि तक्रार क्रमांक दर्शविणारा माहिती फलक लावणे बंधनकारक असतानाही जामखेड तालुक्यातील अनेक रेशन दुकानांमध्ये हे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता तथा भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव रावीकुमार शिंदे यांनी मा. तहसीलदार, जामखेड यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून संबंधित सर्व स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून शासन नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक दुकानांमध्ये धान्याचे दर, उपलब्ध साठा, वितरण तारीख, लाभार्थी माहिती आणि तक्रार क्रमांक दर्शविणारे माहिती फलक उपलब्ध नसल्याने नागरिकांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव निर्माण होत असून लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व शासन निर्देशांनुसार माहिती फलक लावणे बंधनकारक असून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच जामखेड तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबवून नागरिकांना योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
✍️ रावीकुमार शिंदे
माहिती अधिकार कार्यकर्ता
भारतीय पत्रकार अधिकार परिषद
महाराष्ट्र राज्य सचिव
#जामखेड #अहिल्यानगर #रेशनदुकान #स्वस्तधान्यदुकान #NFSA #PDS #माहितीअधिकार #RTI #MarathiNews #BreakingNews #जनहित #सरकारीनियम #FoodSecurity #Maharashtra



