अहमदनगर :लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे *श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पाथरे बु* ता. राहाता येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ‘भारतरत्न’ पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीचा दिवस हा बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री भास्करराव विश्वनाथ पा घोलप हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका मा. सौ लीलावती सरोदे मॅडम उपस्थित होत्या .
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही हो, पण गगनभरारीच वेड रक्तातच असावं लागत! या गगनभरारीसाठी प्रवरेच्या या पावन भूमित आसमंत खुले करून देणारे प्रवरा परिसराचे भाग्यविधाते संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब (महसूल ,पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मा. डॉ. सुष्मिताताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा शैक्षणिक संकुलात विविध महोत्सव सहकाराकडून समृद्धीकडे या मूलमंत्रा खाली गणेशोत्सव नवरात्र उत्सव बिल्डिंग प्रवरा यासारखे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्याची नोंद जागतिक पातळीवर देखील झालेली आहे यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत असतो. नवीन पिढीला नाविन्याची हौस असते, तर नव्या वाटेवर चालताना जुने वळण विसरून चालत नाही म्हणून आधुनिकता व परंपरा यांचा मेळ घातला जावा यासाठी हे कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रमाणपत्राचा उपयोग प्लेसमेंटसाठी होतो. असे मत यावेळी माध्यमिक विभागाच्या श्रीमती नळे मॅडम यांनी व्यक्त केले.
बालदिनाच्या निमित्ताने जणू लहान मुलांचा एक उत्सवच होत असतो. लहानपण देगा देवा असे आपण म्हणत असतो. वयोगटाच्या या काळातच मुलांवर मार्गदर्शनाची चांगली मुल्ये व संस्कार रूजले तर त्यांचे व्यक्तीमत्त्व उज्ज्वल बनू शकते.बालवयातच मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजेत. आरोग्य, शिक्षण, क्रीडा यासाठी मुलांना सक्षम केले पाहिजे. लहान मुलांचे मन आणि मनगट बळकट होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्त्न केले पाहिजेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांप्रती अत्यंत आत्मियता, आपुलकी व आंतरिक जिव्हाळा होता. यातून नेहरूंना लहान मुलांची मोठी आवड होती. सर्व बालके संपन्न झाली पाहिजेत. सुसंस्कारीत मुले घडली पाहिजेत. मुले ही देवाघरची फुले असे मानले जाते. नेहरूंनी देखील त्या प्रमाणेच लहान मुलांमध्ये गोडी निर्माण केली असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सरोदे मॅडम यांनी केले. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेकडून विद्यालयासाठी Smart Interactive Borad देण्यात आला त्याचे उद्घाटन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली तसेच बाल दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती
या कार्यक्रमासाठी मा. उमेश गिताराम पा. घोलप (सरपंच ग्रामपंचायत पाथरे बु) मा. शिवाजी नरहरी पा घोलप मा. बाळासाहेब भागवत पा घोलप मा. सोपान लक्ष्मण पा. घोलप मा. बाळासाहेब दशरथ पा. कडू मा. आबासाहेब रावसाहेब पा कडू मा. नरहरी कारभारी पा घोलप मा गुलाब भाई शेख विद्यालयाचे प्राचार्य श्री के बी बारगुजे सर उपप्राचार्य वाणी मॅडम प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री घुगे सर पर्यवेक्षक तांबे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. संदीप म्हस्के सर आदींसह परिसरातील सर्व पालक व समस्त ग्रामस्थ पाथरे बु सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे श्रीमती जोंधळे मॅडम सूत्रसंचालन श्रीमती घोलप मॅडम, अध्यक्ष निवड श्रीमती मांढरे मॅडम तर आभार प्रा संजय कडू सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.