A2Z सभी खबर सभी जिले की

बालिकाश्रम रोड परिसरात आ. संग्राम जगताप यांच्या विकास यात्रेचे जोरदार स्वागत

अहिल्यानगर :नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ बालिकाश्रम रोड,बोरुडेमळा परिसरातून नगर विकास यात्रा काढण्यात आली.
बालिकाश्रम रोड, बोरुडेमळा परिसरात अबालवृध्दांसह महिलांनी विकास यात्रेचे जंगी स्वागत केले.

यावेळी बालगोपाळांपासून ज्येष्ठ नागरिकांनी आ.जगताप यांची भेट घेऊन प्रचार रॅलीत सहभाग नोंदवला.कार्यकर्त्यांनी घातला आ.जगतापांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला.तर दिव्यांग महिलेची सन्मानपूर्वक भेट घेऊन आ. जगताप यांनी यावेळी मतदानाचे आवाहन केले.

आ.जगताप यांनी गुरुद्वाऱ्यात जावून गुरुनानक देवजी यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक,महिला व युवकांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला.

Screenshot 2024 1117 211952

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!