A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

राजकीय श्रेयवादात अडकला जवळे कडलग – वडगाव लांडगा रस्ता

राजकीय श्रेयवादात अडकला जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्ता

संगमनेर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेले तालुक्यातील जवळे कडलग ते वडगाव लांडगा या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने या रस्त्यावरून ये- जा करणे अवघड होत आहे. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तालुक्यात राजकीय सत्तांतर झाल्याने राजकीय श्रेयवादात या रस्त्याचे काम अडकले असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

 

जवळे कडलग ते वडगाव लांडगा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ कोटी २५ लाख रुपये या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेले आहे. या रस्त्याच्या

 

कामाची निविदा काढण्यात आल्यानंतर या रस्त्याचे काम येवले कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले.

 

विधानसभा निवडणुका होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटूनही या रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आ लेले नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत

 

करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी तालुक्यामध्ये एकच अभियंता आहे. अभियंत्याला बसण्यासाठी कार्यालय नाही. या खात्याच्या माध्यमातून तालुक्यात होणाऱ्या रस्त्यांच्या कामाच अधीक्षक अभियंता दर्जाच्य अधिकाऱ्याने चौकशी करावी, अशीही मागणी सुनील देशमुख, संदेश देशमुख सुरेश कडलग, गोरख लांडगे, मदन देशमुख, सोमनाथ लांडगे, बापू देशमुख अशोक देशमुख आदींनी केली आहे.


Discover more from Vande Bharat Live Tv News

Subscribe to get the latest posts sent to your email.

Back to top button
error: Content is protected !!

Discover more from Vande Bharat Live Tv News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading