?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस हाताळणाऱ्या दोघास भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद

IMG 20250607 193443

पुणे: 5 जुन 2025 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे व पोलीस स्टाफ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना कात्रज कोंढवा रोडवरील कपिलाअमृत डेरीजवळ मोकळ्या मैदानामध्ये तीन इसम गावठी कट्टा हाताळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता आरोपी नामे 1) शुभम प्रमोद माने वय 26 वर्ष, रा. शिवशंभू नगर, गल्ली नंबर 4, कात्रज कोंढवा रोड. 2) गणेश बाबासाहेब लंके वय 27 वर्ष, रा. ओमनिवास, महादेव नगर, गल्ली नंबर 9, शेलार मळा, कात्रज कोंढवा रोड, पुणे. हे गावठी कट्टा हाताळताना आढळून आले.

  वरील नमूद आरोपीकडून 30,000/- रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व 1000/- रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. व त्यांच्याविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर 278/2025, भारतीय हत्यार अधिनियम कलम 3 सह 25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) (3) सह 135, भा. न्या. सं. कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व एक तिसरा साथीदार हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांकडून देण्यात आली.

सदर कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडल – 2 श्रीमती स्मर्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. राहुलकुमार खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. समीर शेंडे, पोलीस अंमलदार सौरभ वायदंडे, संग्राम पवार, सागर कोंडे, केतन लोखंडे, यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!