सूचना का अधिकार जनता का हथियार है, इसे जेब मत समझिए – दीपक पाचपुते, सामाजिक कार्यकर्ता
A2Z सभी खबर सभी जिले की
23/04/2025
सूचना का अधिकार जनता का हथियार है, इसे जेब मत समझिए – दीपक पाचपुते, सामाजिक कार्यकर्ता
पहले कानून लागू करना सीखो, फिर आरटीआई कार्यकर्ता पर आरोप लगाओ..! सूचना अधिकार कार्यकर्ता दीपक पाचपुते ने स्पष्ट मत व्यक्त…
गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला : जिल्ह्यातील १ हजार २२३ सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ; ६२५ महिला पाहणार गावचा कारभार!
A2Z सभी खबर सभी जिले की
20/04/2025
गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला : जिल्ह्यातील १ हजार २२३ सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ; ६२५ महिला पाहणार गावचा कारभार!
अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण संख्या प्रवर्गानिहाय अधिसूचित केली…
आपले सरकार” सेवांतील विलंब रोखण्यासाठी दररोज दंड लावण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
A2Z सभी खबर सभी जिले की
18/04/2025
आपले सरकार” सेवांतील विलंब रोखण्यासाठी दररोज दंड लावण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, १८ एप्रिल २०२५: प्रतिनिधी राविराज शिंदे राज्य शासनाच्या “आपले सरकार” पोर्टलवरील सेवांचा लाभ नागरिकांना वेळेत व कार्यक्षमतेने मिळावा, यासाठी…
सरपंचपदाची उपविभागीय,तहसीलस्तरावर आरक्षण सोडत १२२३ ग्रामपंचायती; २४, २५ एप्रिल रोजी प्रक्रिया…
A2Z सभी खबर सभी जिले की
18/04/2025
सरपंचपदाची उपविभागीय,तहसीलस्तरावर आरक्षण सोडत १२२३ ग्रामपंचायती; २४, २५ एप्रिल रोजी प्रक्रिया…
अहिल्यानगर : प्रतिनिधी राविराज शिंदे पुढील पाच वर्षांसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. प्रवर्गनिहाय राखीव…
कृषी विभागाच्या कांदाचाळ, ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानात वाढ
A2Z सभी खबर सभी जिले की
17/04/2025
कृषी विभागाच्या कांदाचाळ, ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानात वाढ
अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या कांदाचाळ, ट्रॅक्टर, पॉवर टिलरच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.…
अहिल्यानगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या कांदाचाळ, ट्रॅक्टर, पॉवर टिलरच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदाचाळ करण्यासाठीची मर्यादाही वाढली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर अनुदानाच्या आर्थिक मापदंडात बदल करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानच्या नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनेक योजनांचा लाभ दिला जातो. त्यासाठी अनुदान देण्यात येते. पाच वर्षांपासून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरावे लागत आहेत. एकाच अर्जात आता विविध योजनांचा लाभ दिला जातो. अलिकडच्या काळात साहित्याचे दर वाढल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात होती. कांदाचाळ उभारणी वाढेल राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे राज्यात कांदाचाळ बंधण्यासाठी अनुदान मिळावे, अशी मागणी अधिक आहे. कांदाचाळीसाठी लागणारे लोखंड व अन्य साहित्यांचे दर चार वर्षांत दुपटीने वाढले. अनुदान मात्र जुन्याच पद्धतीने दिले जात होते. साहित्याचे दर वाढल्याने व अनुदान कमी असल्याने कृषी विभागाच्या कांदाचाळ उभारणीवर परिणाम होत असल्याबाबत ‘ॲग्रोवन’नेही अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले. आता अनुदानात वाढ झाली असून पंचवीस टनी कांदाचाळीसाठी ३७ हजार ५०० रुपये अधिक मिळणार असल्याने कांदाचाळ उभारणीला वेग येईल, अशी शक्यता आहे. कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने नुकत्याच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानच्या विविध योजनांच्या अनुदान दराबाबतचे मापदंड निश्चित करून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कांदाचाळीच्या अनुदानात आता वाढ करण्यात आली आहे. पूर्वी २५ टनांपर्यंत कांदाचाळ उभारणीची मर्यादा होती. प्रति टन सात हजारांचा खर्च गृहीत धरून प्रति टनाला पन्नास टक्के म्हणजे साडेतीन हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. आता २५ टनांपर्यंतचे प्रति टनाचे अनुदान पाच हजार रुपये केले आहे. आता कांदाचाळ मर्यादाही वाढली आहे. २५ टनांपासून ५०० टनांपर्यंत ८ हजार रुपये टनाला खर्च गृहीत धरून ४ हजार रुपये अनुदान मिळेल. शिवाय आता १ हजार टनापर्यंत कांदाचाळ करता येईल. त्याला ६ हजार रुपये प्रति टन खर्च गृहीत धरून तीन हजार रुपये टनाला अनुदान मिळेल. आहे. अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना २० बीएचपी (२ डब्लूडी) क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी पूर्वी १ लाखाचे अनुदान मिळत होते. ते आता २ लाख रुपये केले आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी ७५ हजारांचे अनुदान मिळायचे ते १ लाख ६० हजार रुपये केले आहे. अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८ एचपीच्या पॉवर टिलरसाठी पूर्वी ७५ हजारांचे अनुदान मिळायचे ते आता १ लाख तर इतर शेतकऱ्यांना ६५ हजार रुपये मिळायचे, ते आता ८० हजार रुपये करण्यात आले आहे. ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानातही वाढ झाली
श्रीगोंद्यात पकडला आठ लाखांचा गुटखा
A2Z सभी खबर सभी जिले की
17/04/2025
श्रीगोंद्यात पकडला आठ लाखांचा गुटखा
अहिल्यानगर : प्रतिनिधी राविराज शिंदे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे…
विमा कंपन्यांचा अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना ठेंगा ! ‘ती’ नुकसान भरपाई नाहीच..
A2Z सभी खबर सभी जिले की
14/04/2025
विमा कंपन्यांचा अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना ठेंगा ! ‘ती’ नुकसान भरपाई नाहीच..
शेतकऱ्यांना संकटकाळात विमा दिला जातो, शेतकरी याच रकमेवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असतात. परंतु मागील वर्षी २०२४ रोजी झालेल्या कापुस, तुर,…
अहिल्यानगरमधील चारा दुसऱ्या जिल्ह्यात विकायला घेऊन जाण्यास बंदी! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियां यांनी ‘या” कारणामुळे घेतला मोठा निर्णय
A2Z सभी खबर सभी जिले की
12/04/2025
अहिल्यानगरमधील चारा दुसऱ्या जिल्ह्यात विकायला घेऊन जाण्यास बंदी! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियां यांनी ‘या” कारणामुळे घेतला मोठा निर्णय
अहिल्यानगर- जिल्ह्यात चाऱ्याच्या कमतरतेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित चारा, मुरघास…