
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा
राजुरा :-सावली तालुक्यातील मौजा.हिरापूर येथे सावली तालुका काँग्रेस कमेटीतर्फे कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा नवनियुक्त विधिमंडळ काँग्रेस गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता संवाद बैठक पार पडले.सदर संवाद बैठकीत आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व त्यांचा समस्या जाणून घेतल्या,भविष्यातील विविध होणाऱ्या निवडणूका व पक्ष संघटन याकडे अधिक लक्ष देऊन काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याकरिता सर्वांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी आवाहन केले.
याप्रसंगी नुकतेच काँग्रेस विधिमंडळ गटनेते पदी नियुक्त झाल्याबद्दल आमदार विजय वडेट्टीवार यांचा स्वागत सत्कार सोहळा प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितीत पार पडला,करिता मंचावर माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटणुरवार,माजी जि.प.सदस्य पांडूरंग पाटील तांगडे,तालुका अध्यक्ष नितीन गोहने ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिवराज पाटील शेरकी,उपसभापती दिवाकर पाटील भांडेकर,संचालक प्रशांत पाटील चिटणुरवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी, शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष लता लाकडे,युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार,महिला शहर अध्यक्षा भारती चौधरी,जेष्ठ कार्यकर्ता गोपाल रायपूरे आदी मान्यवर उपस्थित होते.