A2Z सभी खबर सभी जिले की

प्रताप सरनाईकाच्या प्रेसकॉन्फरन्स नंतर एका पुणेरी रिक्षा चालकांनी फोडला दुःखाचा हंबर्डा

IMG 20250214 100134 IMG 20250214 100110

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर एका पुणेरी रिक्षा चालकाने आपल्या व्यावसायिक दुःखाचा फोडला हंबर्डा.

माननीय परिवहन मंत्री महोदय सांगत आहेत की राज्यामध्ये एक लाख रिक्षा व टॅक्सी चालक आहेत. परिवहन मंत्री साहेब पुणे व पिंपरी चिंचवड मध्येच सव्वा लाखाच्या आसपास रिक्षा आहेत राज्यात किती असतील ते विचार करण्याची गोष्ट आहे.
अजून महत्वाची गोष्ट हे गरीब कष्टकरी कामगार लोकांचे लूबाडणूक करण्याचे धोरण दिसत आहे.
65 वयाच्या नंतर जाचक अटी पार झाल्याच्या नंतर दहा हजार रुपये मानधन देत आहेत. व यांनी आकडा काढला 14 हजार रिक्षा चालक योजनेस पात्र हे कधी व कसे ठरले?
व कल्याणकारी मंडळासाठी 50 कोटी रुपये म्हणजे.
राज्यातल्या सर्व रिक्षा व टॅक्सी🚕 🛺 चालकांना मिळून दोन दोन वडापाव घेतले तरी येनार नाहीत त्याची नोंद आपण घ्यावी.
मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आम्हाला काही नको पण चालू असलेला परमिट कायमस्वरूपी बंद करा राज्यातील अनलिगल वाहतूक बंद करा.
महाराष्ट्र शासनाचा ॲप लवकरात लवकर सुरू करा ओला, उबेर, रॅपिडो, महाराष्ट्रातून हद्दपार करा.
टू व्हीलर बाइक टॅक्सी आम्हाला नको आहे 100% विरोध असेल. भाकरी एक दिली खाणाऱे 100 एक दिवस रिक्षा चालकाचे जगणे जगून तरच तुम्हाला सध्याची वस्तुस्थिती कळेल. फायनान्स कंपनीच्या कर्जामुळे अनेक रिक्षा चालक वैतागले आहेत आत्महत्या करत आहेत.
मुद्रा लोन आहे पण ते गरीब रिक्षा चालकांना मिळत नाहीत दोन लाख वीस हजाराची रिक्षा फायनान्स कडून घेतली तर साडेचार लाख रुपये भरावे लागत आहेत.यावर कधी तुम्ही विचार केला आहे का मायबाप सरकारने.
विनंती आहे की आम्हाला काही नको या आमच्या मुळावर उठलेल्या कंपन्या हद्दपार करा.वाट टू व्हीलर बाइक टॅक्सी मुंबई पुणे या ठिकाणी चालू करू नका. अनेक गरीब रिक्षा चालकांचा जीवन मरण्याचा प्रश्न आहे.

माननीय महोदय फक्त आणि फक्त रिक्षा टॅक्सी चालकांच्या हितार्थ  निर्णय व्हावा हीच अपेक्षा

कळावे आपला दु:खी 🙏.
पुणेरी रिक्षा चालक

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!