A2Z सभी खबर सभी जिले कीपुणेमहाराष्ट्र

भव्य रक्तदान व मोफत महाआरोग्य शिबिर दत्तनगर, कात्रज गुजरवाडी रोड पुणे येथे संपन्न

शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेशभाई कदम, स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे,
लायन्स क्लब ऑफ पुणे, लायन्स क्लब ऑफ पुणे आय फाउंडेशन मा. विठ्ठलराव वरुडे पाटील, व वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज पुणे विशाल बाळासाहेब अडागळे, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मा. अखिलभाऊ नायर, मा. भाग्यजीत जाधव पाटील, मा. सदाशिव जाधव, मा. रमेशभाऊ पवार, यांच्या पुढाकाराने व विशेष सहकार्याने वार गुरुवार 12 जून 2025 रोजी मोफत भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया, मोफत बीपी, शुगर तपासणी, जनरल चेकअप व मोफत औषधे वाटप, मोफत दंत तपासणी, महिलांची जनरल तपासणी व मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, मोफत डोळ्याचे ड्रॉप्स व जनरल तपासणी, मोफत औषधे वाटप करण्यात आले आहे. व हे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर दत्त मंदिर, दत्तनगर, कात्रज गुजरवाडी रोड, कात्रज पुणे येथे उत्साहात पार पडले.

या आरोग्य शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे क्राइम पी. आय. मा. श्री. राहुल खिल्लारे आयोजक शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज महाराष्ट्र राज्य संस्थापक, अध्यक्ष मा.महेशभाऊ सुरेशभाऊ कदम, मा. अखिलभाऊ नायर, मा.भाग्यजीत जाधव पाटील, मा. विशाल बाळासाहेब अडागळे (न्युज रिपोर्टर), मा.सदाशिव जाधव, मा.रमेशभाऊ पवार, यांच्या शुभहस्ते व मा. सुदर्शन चौघुले, मा. विकास कसबे, मा. गौतम कांबळे, मा. आझादभाई, मा. संदीप काळे, मा. तानाजी धारपाळे, मा. भाऊसाहेब गोरड, मा. नागेश कैकरी, मा. शब्बीर शेख, मा. बाबुशा गुंड, अखिल दत्तनगर मित्र मंडळ कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी शिबिरासाठी सोपानकाका नगर, दत्तनगर, भारत नगर, जाधव नगर, गुजरवाडी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला. 227 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.174 नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी 42 नागरिकांची नोंद झाली. 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 104 नागरिकांनी दंत तपासणी केली. 87 नागरिकांनी बीपी, शुगरची तपासणी केली. 107 नागरिकांना डोळ्याचे ड्रॉप्स वाटप करण्यात आले.

एच व्ही देसाई हॉस्पिटल महमदवाडी पुणे, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे, शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल रास्ता पेठ पुणे, समता फाउंडेशन मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने मा. विठ्ठलराव वरुडे पाटील, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन, संस्थापक अध्यक्ष माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब पुणे कात्रज, मा. हेमलता जैन, दत्तनगर मित्र मंडळ, भारत नगर मित्र मंडळ, जाधव नगर  मित्र मंडळ, पदाधिकारी व कार्यकर्ते मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!