
Press Note
Pimpri – Chinchwad, Pune
पिंपरी चिंचवडकरांसाठी राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय..!
पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळालं आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. मी मुख्यमंत्री महोदय यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो.
पिंपरी-चिंचवडसारख्या वेगानं विकसित होणाऱ्या महापालिकेला स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची नितांत गरज होती. नागरिकांना आता पुण्याला न जाता स्थानिक न्यायालयांतूनच न्याय मिळेल, याचा आनंद आहे.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015