A2Z सभी खबर सभी जिले की

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहरातून ४ तरुणींसह ९ जण बेपत्ता

छत्रपती संभाजीनगर (अशोक मुळे)

: छत्रपती संभाजीनगर शहरातून ऐन दिवाळीत ९ং जण बेपत्ता झाले आहेत. यात ४ तरुणींचा समावेश आहे. त्या त्या पोलीस ठाण्यांत ते हरवल्याची नोंद झाली असून, पोलीस शोध घेत आहेत. सिडको पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार, २० ऑक्टोबरला एन ७ अयोध्यानगरातून १८ वर्षीय तरुणी घरून बेपत्ता झाली. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार, १९ वर्षीय तरुणी २० ऑक्टोबरला संघर्षनगरातून घर सोडून गेली. दौलताबाद पोलीस ठाण्यात १८ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची तक्रार १९ ऑक्टोबरला करण्यात आली आहे. सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात आदर्शनगर केंब्रीज चिकलठाणा येथून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद १९ ऑक्टोबरला करण्यात आली आहे. याशिवाय ह्सूलच्या तुळजाभवानी चौक भागात राहणारा ४३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद हर्सूल पोलीस ठाण्यात आज, २१ ऑक्टोबरला करण्यात आली आहे. अन्य बेपत्ता असे : रहीमनगरातून २५ वर्षीय तरुण (जिन्सी पोलीस ठाणे), सिडको एन ९ मधून ३४ वर्षीय महिला (सिडको पोलीस ठाणे), दौलताबाद येथून २६ वर्षीय विवाहिता (दौलताबाद पोलीस ठाणे), गवळीपुरा छावणीतून २९ वर्षीय युवक (छावणी पोलीस) बेपत्ता झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ग्रामीण भागातून ५ बैपत्ता हैबतपूर (ता. गंगापूर) येथून २४ वर्षीय विवाहिता चिमुकलीसह, राजुरा (ता. वैजापूर) येथून ३५ वर्षीय महिला, बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथून ५० वर्षीय पुरुष (यांचा मृतदेह नंतर विहिरीत आढळला), गाढेपिंपळगाव (ता.. वैजापूर) येथून २८ वर्षीय तरुण, गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथून ३२ वर्षीय युवक असे ५ जण ग्रामीण भागातून बेपत्ता झाले आहेत. त्या त्या पोलीस त्यांच्या कुटुंबीयांनी हरवल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!