
सावनेर तालुक्यातील वाकोडी शिवारातील घटना. शेतात खोट्याला बांधून असलेल्या वासराला खुट्यासहित ओढून वाघाने वासराची शिकार केली. ही घटना वाकोडी शिवारात घडली अजय वासुदेवजी खोरगडे मु. वाकोडी असे शेतमालकाचे नाव आहे.
ही घटना सकाळी उघडीस आल्यानंतर वन विभागाचे अधिकारी गोविंद मेंढे ए. एच. झोटिंग यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी पंचनामा करून निघून गेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व मजूर शेतामध्ये जाण्यास घाबरत आहे.
शासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची अत्यंत गरजेचे आहे. असे न झाल्यास शेतकऱ्यावर फार मोठे संकट येण्याची शक्यता आहे.
*प्रतिनिधी: सूर्यकांत तळखंडे 9881477824*
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.