A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

पुणे: आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत माजवणाऱ्या आकाश थोरात टोळीवर मोकोका अंतर्गत मोठी कारवाई

दिनांक ०५/०४/२०२५ रोजी रात्री १०/३० वा. चे सुमारास यातील फिर्यादी व त्यांचा मित्र असे दुचाकीवरून राहते घरातून कात्रजकडे जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळी प्रमुख आकाश भरत थोरात, वय ३२ वर्षे, रा रुम नं २. परदेशी बिल्डींग जवळ, साच्चाईमाता मंदिराच्या गागे, अटल चाळ नं ४. आंबेगाव खु॥ पुणे, २) टोळी सदस्य अजित अंकुश धनावडे वय २४ वर्षे (पाहिजे आरोपी), ३) टोळी सदस्य आदित्य जालिंदर शिंदे, वय १८ वर्षे, ४) टोळी सदस्य रोहीत बाळासाहेब कचरे वय २१ वर्षे ५) टोळी सदस्य विशाल उर्फ मोङया दिपक गणेचारी वय २१ वर्षे, यांचे सांगणेवरून एकुण सहा विधीसंघर्षित बालकांनी फिर्यादींच्या दुचाकीस गाडचा आडव्या मारून “तुम्हाला लय मस्ती आली का. तुमचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे यांनी आमचा मित्र आदित्य शिंदे यास मारहाण केली आहे. तुम्हाला आमच्या भाईनी बघून घ्यायला सांगीतले आहे. तुम्हाला आत्ता जिवंत सोडत नसतो.” असे बोलून फिर्यादी व त्यांचा मित्र यांस जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचेवर धारदार हत्याराने वार करून गंभिर जखमी केल्याने आंबेगाव पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९,१२६ (२), ३५२.३ (५), क्रि. लॉ. अं. अॅ. कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर घटनेत फिर्यादी यांचा मित्र उपचारादरम्यान मयत झाल्याने भारतीय न्याय संहिता क. १०३ प्रमाणे कलमवाढ केलेली आहे.
नमुद आकाश थोरात टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर संयुक्त व वैयक्तीकपणे सन २०१५ पासुन एकुण १० गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, सदर गुन्हे त्यांनी त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करून त्यापासून आर्थिक फायदा मिळवीण्यासाठी केलेले आहेत, टोळी प्रमुख आकाश भरत थोरात याने त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक वेळी वैगवेगळ्या गुन्हेगार साथीदारांचा वापर केलेला आहे. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर प्रत्येक वेळी प्रतिबंधक कारागाई करून देखील त्यांच्या बेकायदेशीर कारवाया वाढत चाललेल्या असल्याने त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक होते.
यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने य आर्थिक फायदयासाठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन. १९९९ चे कलम ३ (१) (३), ३(२).३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करणेकामी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने यांनी मा.पो.उप-आयुक्त परि-२, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करून आंबेगाव पोलीस ठाणेस गुन्हा रजि. क्र. ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता क. १०३,१०९,१२६ (२),३५२. ३(५) आर्म अॅक्ट कलम ४(२५), सह फि. लॉ. अं. अॅ. क ७ प्रमाणे दाखल गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम रान. १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिग प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेश बनसोडे यांनी दि ०३/०६/२०२५ रोजी मान्यता दिलेली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, पोलीत सह आयुक्त, पुणे शहर मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर, मा. अतुल नवगिरे, सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग तथा अतिरिक्त कार्यभार स्वागेट विभाग, पुणे शहर मा. राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन, श्री गजानन चोरमुले पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. भोजलिंग दौडमिरो, सहा. पोलीस निरीक्षक, श्री युवराज शिंदे पोलीस उप निरीक्षक व स.पो. फौजदार चंद्रकांत माने, पो. हया, ७४२१ ढमढेरे, पो शि. ८१३८ अजग सावंत, पो. शि. आबासो खाडे यांनी केली आहे.
Back to top button
error: Content is protected !!