लातूर
Trending

आम्ही ‘रंगांचे ‘ गोंधळी…. ………………………… कान्हा कला प्रदर्शन लातूरकर रसिकांना भुरळ घालणार लातूर / वा. नानाविध चित्ताकर्षक रंगसंगती लाभलेली मोहक पेंटिंग्ज घेऊन लातूरकर रसिकांना भुरळ घालणारे कान्हा कला प्रदर्शन लातूरनगरीत येत्या 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत आयोजिण्यात आले असून या मोफत कलाप्रदर्शनाची जोरदार पूर्वतयारी सुरु आहे.

आम्ही ‘रंगांचे गोंधळी'…. कान्हा कला प्रदर्शन लातूरकर रसिकांना भुरळ घालणार लातूर / वा. नानाविध चित्ताकर्षक रंगसंगती लाभलेली मोहक पेंटिंग्ज घेऊन लातूरकर रसिकांना भुरळ घालणारे कान्हा कला प्रदर्शन लातूरनगरीत येत्या 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत आयोजिण्यात आले असून या मोफत कलाप्रदर्शनाची जोरदार पूर्वतयारी सुरु आहे.

प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि/विशेष प्रतिनिधि लातूर

आम्ही ‘रंगांचे ‘ गोंधळी….
…………………………
कान्हा कला प्रदर्शन लातूरकर रसिकांना भुरळ घालणार
लातूर / वा.
नानाविध चित्ताकर्षक रंगसंगती लाभलेली मोहक पेंटिंग्ज घेऊन लातूरकर रसिकांना भुरळ घालणारे कान्हा कला प्रदर्शन लातूरनगरीत येत्या 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत आयोजिण्यात आले असून या मोफत कलाप्रदर्शनाची जोरदार पूर्वतयारी सुरु आहे.
लातूर येथील चवंडा आर्ट गॅलरीच्या वतीने ही कलात्मक मेजवानी कलाप्रेमींसाठी आयोजिण्यात आली आहे.ही माहिती प्रदर्शनाच्या संयोजिका गीता रविशंकर चवंडा यांनी येथे दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन 26 ऑगस्ट रोजी कृष्णाष्टमीचा मुहूर्त साधून होणार असून, प्रदर्शनात आपल्या परिसरातील कलावंतांच्या अत्यंत निवडक व खास कलाकृती असतील. चित्रकला, शिल्पकला व रांगोळी विषयांतील कलावंतांनी या प्रदर्शनात आपल्या कलाकृती सादर करण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
प्रदर्शनाचे स्थळ पद्मानगर भागातील इस्काॅन टेम्पलच्या बाजूला चवंडा हाॅस्पिटल परिसरात असून वरील कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वा. पर्यंत या प्रदर्शनाचा सर्वांना विनामूल्य लाभ घेता येईल. प्रदर्शनात सिद्धहस्त कलावंतांच्या कुंचल्यातून साकारलेल्या जवळपास पन्नास कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रदर्शन कालावधीत शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून जागीच चित्रकृती काढून त्या प्रदर्शित करता येतील, असे संयोजिकाशगीता चवंडा म्हणाल्या.
या प्रदर्शनात कलारसिकांना हणमंतराय तलवार, राजाभाऊ बनाळे, प्रशांत साळुंखे, रणखांब सर, शिवाजी हांडे आदी मनस्वी कलावंतांच्या बहारदार चित्रकलाकृतींचा मनसोक्त आस्वाद घेता येईल.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर/लातूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष देवाशिष टोकेकर

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!