प्रेस नोट
प्रतिनिधि लातूर
स्व. जनाबाई वडणे यांचे मरणोत्तर देहदान
लातूर ।
येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या एडवोकेट मीनाताई गायकवाड यांच्या मातोश्री स्व.
जनाबाई हरिदास वडणे वय 80 यांचे नुकतेच निधन झाले .जनाबाई यांनी दहा वर्षांपूर्वी देहदानाचा फॉर्म सोलापूर येथे भरून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला होता. मरणानंतरही आपला देह समाजाच्या कामी यावा या हेतूने त्यांनी त्या काळात देहदान करण्याचा संकल्प जाहीर केला .यापूर्वी त्यांच्या
घराण्यात कोणीही तसा संकल्प केलेला नव्हता. तशी परंपराही या कुटुंबामध्ये नव्हती .परंतु जनाबाईंनी आपल्या पुढच्या पिढीमध्येही समाजभान जागृत ठेवण्याचा संदेश आपल्या देहदानातून दिला. या संकल्पानुसार परवा त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा देह येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला. जनाबाईंचे जावई
प्राचार्य धनंजय गायकवाड , भाजपा नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर,आणि चिरंजीवांबरोबरच कन्याही उपस्थित होत्या .यावेळी अनेकांनी स्वर्गीय जनाबाईंच्या सामाजिक बांधिलकीबद्दल व त्यांच्या धाडसी निर्णयाबद्दल कौतुक केले .या देहदानातून प्रेरणा घेऊन याच दिवशी आणखी
तीन व्यक्तींनी देहदानाचा फॉर्म भरून आपला देहही मरणोत्तर राखेच्या स्वाधीन करण्यापेक्षा समाजहितासाठी देण्याचा संकल्प केला, हे विशेष.
ऑल इंडिया मीडिया एसोसियेशन नागपुर
जिला अध्यक्ष
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपुर
सम्पादक
दिल्ली क्राइम प्रेस एड. एसोसिएट नागपुर
हमारा मकसद हर एक जरूरतमंद चाहे वह किसी भी वर्ग, धर्म या जाति का हो उसकी आवाज़ को उठाना और सही जगह तक पहुँचाना है।
Social Connects
Facebook
Twitter
YouTube
Instagram
Contact Us
Address:- Plot 18/19, flat no.201,Harmony emporise , Payal -pallavi society,new Manish Nagar, somalwada, nagpur,Pincode- 440015 ,Maharashtra
Phone:- +91-9422428110/9146095536