संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र
बल्लारपूर : बल्लारपूर बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर चा खेळाडू आरुष अंकुश चव्हाण या खेळाडूची राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे 400 मीटर धावणे आणि लांब उडी मध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरावरील 14 वर्षाखालील मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये आरुष ला सुवर्णपदक प्राप्त झाले तसेच लांब उडी मध्ये सुद्धा आरुष ने सुवर्णपदक प्राप्त केले. बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणावर आरुष अंकुश चव्हाण नियमितपणे सराव करत असतो . बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी आरुष ला प्रशिक्षण दिले तसेच आरुष चे वडील अंकुश चव्हाण यांनी सुद्धा आरुष च्या सरावांमध्ये मोठे योगदान दिले . क्लबचे सर्व सदस्य ज्यामध्ये महेंद्र भोंगाडे , युवराज बोबडे ,सुरेश गोडे , शांताराम वाड़गुरे ,प्रज्वल आवते ,शॉनल कायरकर, रवी अन्सुरी , दत्तू भलवे , काशी सिंग , श्रीनिवास , परमेश्वर , मंथन कुकडकर यांनी आरुषचे राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या . आपल्या उदबोधनांमध्ये बी.एस.बी. एस. चे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी आरुषने पुन्हा कठीण परिश्रम करण्याचा सल्ला दिला , जेणेकरून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून बल्लारपूर शहराचे तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करावे . याकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आयुषच्या या यशामध्ये त्याने आपले आई-वडील बी एस बी एस रचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि सर्व मित्रांना धन्यवाद दिला . आयुषच्या विजयामुळे बल्लारपूर शहरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.