A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

योगनृत्य चा यवतमाळ येथेही डंका.

संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र

चंद्रपूर :  योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर चे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा यांचे मार्गदर्शनात वणी जिल्हा यवतमाळ येथे बौद्धघोष विहार परिसरात नवीन योगनृत्य केंद्राचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमास जिल्हा महिला प्रभारी किशोरीताई हिरुडकर जिल्हा प्रभारी सुरेशभाऊ घोडके उपजिल्हा प्रभारी प्रमोद बाविस्कर कोषधिकारी आशिष झा सर सांस्कृतिक मंत्री प्रशांत कत्तूरवार सर उत्तर मंडळ प्रभारी श्रीकांत रॉय जितेंद्र सरबेरे इत्यादीची प्रमुख उपस्तिती होती मान्यवारांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले सर्व प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली किशोरीताई हिरुडकर यांनी मनोगतातून योगनृत्य शरीरासाठी किती आवश्यक आहे त्यामुळे बुद्धीचा विकास तंदुरुस्त ताजेतवाने राहते काम करण्यास उत्साह निर्माण होतो पचन शक्ती वाढते पोट साफ तर रोग साफ रोग प्रतिकार शक्ती वाढून बिमारी पासून कोसो दूर राहते गुलाबी थंडीचा फायदा घेत रोज सकाळी योगडान्सला या सदर योगा निशुल्क असून त्याचा फायदा घ्या असे कळकळीचे आवाहन केले जितेंद्र सरबेरे राजू उईके विवेक माटे वैशाली बाविस्कर सरिता दुर्गे रंजू मोडक छाया हिरोळे या सर्वांनी क्लास घेऊन लोकांमध्ये जनजागृती व उत्साह निर्माण केला केंद्र प्रमुख रविना बंड जितेंद्र सरबेरे आणी टीम नी केंद्र सुरु करण्यासाठी अथक परिश्रम घेतले सूत्र संचालन रविना बंड यांनी तर आभार प्रतीक्षा मॅडम हिने मानले नास्ता चहा पानानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!