संजय पारधी चंद्रपूर, महाराष्ट्र
चंद्रपूर : योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर चा सातवा वर्धापन दिन मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथे साजरा करण्यात आला व्यासपीठावर योगनृत्याचे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा महिला संघटन प्रभारी राधिकाजीं मुंधडा महिला जिल्हा प्रभारी किशोरीताई हिरुडकर जिल्हा प्रभारी सुरेश घोडके बल्लारपूर केंद्र प्रमुख निशिकांत गहलोत विशाल गुप्ता इत्यादी मान्यवारांची उपस्तिती होती स्वागत गीत व नृत्य सादर करून कायक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सर्व मान्यवारांनी मनोगत व्यक्त केले या योगनृत्या मुळेच एकमेकांशी संबंध जुळले मित्र परिवार वाढला एकजूटपणा आली तर गोपालजी मुंधडा यांनी या योगनृत्याला सात वर्ष पूर्ण झाल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे अकेला निकला था लोग जुडते गये और कारवा बढता गया ऐका छोटयाशा वृक्षाची सुरुवात केली खूप मेहनत घेऊन अनेक अडचणीवर मात करीत आझाद गार्डन व रामाला तलाव या केंद्राच्या सहकार्याने आज वाटवृक्षाप्रमाणे हा परिवार उभा आहे बचपनसे पचपण तक चा हा सफर लहाना पासून तर मोठया 75 वर्ष्या पर्यंत सदस्य सहभागी आहेत चंद्रापुरात जवळ जवळ 100 च्या आसपास केंद्र सुरु आहेत तर भारतात व विदेश्यात 10 ते 15 ठिकाणी केंद्र चालू आहे आपल्या तंदुरुस्ती साठी प्रकुर्ती ठीक राहावी म्हणून अर्धा तास वेळ दयावा क्लास निशुल्क असून याचा फायदा घ्यावा असे कळकळीचे आवाहन केले सोबतच भाईश्री गोपालजी मुंधडा यांचा वाढदिवस केक कापून व ढोलताश्याच्या गाजरात साजरा करण्यात आला चंद्रपूरातील सर्वच केंद्रप्रमुख उपकेंद्रप्रमुख आपल्या टीमसह उपस्तित राहून सरांचा स्वागत सत्कार करण्यात आला पुरुष व महिला 500 च्या वर उपस्तित होत्या उत्कृष्ट सूत्र संचालन धनंजय तावाडे तर आभार अशोक पडगेलवार यांनी मानले नास्ता चहा पानानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.