
प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव …
श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे
श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. १० फेब्रुवारी :
श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे उप विभाग करून टप्या टप्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
विधानभवनात श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीस विलंब न होता सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जावे, असेही सभापती प्रा.शिंदे यांनी सांगितले.
श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
0000






