A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौ-यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बद

संजय पारधी  चंद्रपूर महाराष्ट्र

चंद्रपूर, दि. 14 : 15 नोव्हेंबर 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या सभेकरीता नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलिस अधिनियम -1951 च्या कलम-33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत वरोरा नाका ते मित्र नगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनाकरीता बंद राहील. वरील दोन्ही मार्ग ‘नो पार्कींग व नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. तरी सदर मार्गावर कोणत्याही नागरीकांनी वाहने पार्कींग करु नये. तसेच या मार्गावर कोणीही दुकाने / हातठेले लावू नये असे आदेशात नमुद आहे.

आवश्यकतेनुसार अधिसुचनेच्या मार्गामध्ये व वेळेमध्ये बदल करण्यात येईल. या कालावधीत सर्व वाहतूकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

1. सदरच्या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका- उड्डान पुल, सिध्दार्थ हॉटेल-बस स्टॅड – प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे जिल्हा स्टेडियम – मित्र नगर चौक- संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.

2. सदरच्या कालावधीत शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट – प्रियदर्शनी चौक – बसस्टॅण्ड चौक- सिध्दार्थ हॉटेल- उड्डाण पुल –वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक – मित्र नगर चौक – जिल्हा स्टेडियम – जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे बाहेर जातील.

नागरिकांनी सदर अधिसूचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

००००००

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!