
Press Note
National Congress Party
Sharadchandra Pawar
सांगलीच्या तांदुळवाडीच्या शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण हर्षल पाटील एका सरकारी कंत्राटदाराकडून काम मिळवितो. ते काम पूर्ण करून देतो पण त्याचा मोबदला हर्षलला मिळत नाही, आर्थिक चणचण भासली म्हणून त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. ह्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरलं. शेतकरी, शिक्षक आणि आता कंत्राटदार… आत्महत्यांचं हे सत्र घातक नाही का? विधिमंडळ पक्षनेते श्री. जयंतराव पाटील ह्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात ह्या समस्येचं सूतोवाच केलं.पण हे सरकारच इतकं निर्ढावलेलं आहे कि, त्यांना कोणत्याच ज्वलंत प्रश्नांची चाड राहिली नाही. हर्षलचा मृत्यू झाल्यावर कुणीही सरकारी अधिकारी भेटायला आले नाहीत. त्याच्या कुटुंबीयांची शासनाकडून विचारपूस झाली नाही. हे खरंच खेदजनक आहे.
पण ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ अशा महत्त्वाच्या प्रश्नांबाबतीत कायम संवेदनशील असणार आहे. म्हणूनच विधिमंडळ पक्षनेते माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री शशिकांत शिंदे ह्यांनी कै. हर्षल पाटील ह्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
कंत्राटदारांचे ८९ हजार कोटी रु. थकवणारं हे महायुती सरकार ह्या समस्येपासून हात झटकत आहे. आज एका उपकंत्राटदाराने आत्महत्या केली पण ८९ हजार कोटी रु. इतक्या मोठ्या मोबदल्यावर अवलंबून असणारी संपूर्ण मानवी उत्पन्नाची साखळीच नैराश्यात जाऊ शकते, आणि काहीही अनर्थ घडू शकतं. त्यामुळे महायुती सरकारनं आता तरी जागं व्हावं, आणि कै. हर्षल पाटील सारख्या अन्य कुणालाही प्राणाला मुकावं लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015