A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

चंद्रपूरची विधी भोगेकरची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड

करणार नागपुर विभागाचे प्रतिनिधित्व

 

:- क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, नागपुर, जिल्हा क्रीडा परिषद, नागपुर व तायक्वांडो असोशिएशन ऑफ नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपुर विभागीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे करण्यात आला. या स्पर्धेत नागपुर विभागाचे वर्धा, भंडारा, गडचिरोली, नागपुर, गोंदिया, व चंद्रपूर जिल्हे आले होते. याच स्पर्धेत स्थानिक दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निग, वरोरा, चंद्रपूर येथील कू. विधी राजेंद्र भोगेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला व समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत आपली जागा निश्र्चित केली. समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत ही ही विद्यार्थिनी नागपुर विभागाचे प्रतिनिधित्व करणार. या उत्कृष्ट विजयी कामगिरी साठी शाळेचे प्रशासन व इतर शिक्षकानी कौतुक केलं. तसेच मार्गदर्शन म्हणून श्री. सचिन बोधाने, श्री. आकाश भोयर, श्री. अक्षय हणमंते यांचा योगदान होता. त्याच प्रमाणे डिस्ट्रिक्ट तायक्योंदो असोशिएशन ऑफ चंद्रपूरचे पदाधिकारी श्री. अमन टेमुर्डे, श्री. तानाजी बायस्कर श्री. सागर कोहळे श्री. मुकेश पाण्डेय (N.I.S. कोच) श्री. बजरंग वानखेडे यांनी समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिली.

 

 

Back to top button
error: Content is protected !!