
संजय पारधी चंद्रपूर महा.
वरोरा : योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालयाचे संस्थापक व योग नृत्याचे जनक भाई श्री गोपाल मुंधडा यांचे मार्गदर्शनात योग नृत्य परिवार कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज केंद्र वरोरा येथील नवीन केंद्राचा जय गुरु शुभारंभ करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजन जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ घोडके, महिला जिल्हाप्रमुख किशोरीताई हिरुडकर, उपजिल्हा संघटक प्रमोद बाविस्कर,सांस्कृतिक मंत्री वैशाली बाविस्कर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा शिबिर प्रमुख अशोक पडगिलवार, संगीता जुनगरे, प्रणिता मानकर, मनीषा पिदुरकर, इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात चैतालीताई देवतळे डॉ. निकिता करडभुजे,मंगलाताई पिंपळकर,माजी नगरसेविका सुनिता मेडूलकर,विठ्ठल देशमुख इत्यादी मान्यवरची प्रमुख उपस्थितीत महिलांचे ग्रुप डान्स, नाटिका,गीत गायन “विशेष म्हणजे” वारकरी पंथाचे भजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. यात अनेक महिलांनी भाग घेऊन मी पण काही कमी नाही असे म्हणत प्रेक्षकांची वाहवा मिळवली व आनंद घेतला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या प्रतिमेस व कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास मालाअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मान्यवरांनी मार्गदर्शन केले योग नृत्याचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने सकाळी डफ वाजवीत मेन रोडनी रॅली काढून चौका-चौकामध्ये योग नृत्याचे प्रात्यक्षिक धडे घेण्यात आले. योग नृत्याचे धडे राधा देवगीरकर,अर्चना टेवरे,नीता नागतुरे,अरुण जुनघरे इत्यादींनी दिले केंद्रप्रमुख प्रणिता मानकर, उपकेंद्र प्रमुख मनीषा पिदुरकर, स्नेहल ठोंबरे, संघटन मंत्री सुनिता परचाके, अश्विनी नवघरे, केंद्रप्रमुख भोला पिदुरकर,केंद्र प्रभारी गजानन मानकर, इत्यादी योग साधकाची नियुक्ती करून त्यांच्यावर केंद्राची जबाबदारी देण्यात आली. स्वतःची प्रकृती ठीक राहावी तंदुरुस्त रहावे व रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी योग नृत्यत्याचे शिबिर गावागावात वार्डा-वार्डात सुरू करण्याचे ध्येय मनाशी सदर केंद्राने बाळगले आहे. हे योग नृत्य निशुल्क असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे कळकळीचे आवाहन केंद्रप्रमुख प्रणिता गजानन मानकर हिने केले, कार्यक्रम ज्योती मते, वंदना काळे,अनिता विदुरकर, अन्नपूर्णा तिखट इत्यादी महिलांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. सूत्रसंचालन ज्योती वानखेडे यांनी केले व आभार प्रदर्शन ज्योती थेरे यांनी केले. त्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.