शाळेने अनेक उपक्रम राबवून उत्कृष्ट यशाचा टप्पा गाठला आहे. सर्व निकष पूर्ण करत तालुक्यात एक वेगळाच पॅटर्न निर्माण केला आहे. परसबाग,पावसाच्या पाण्याचा वापर, वॉटर हार्वेस्टिंग,प्रयोग, वाचनालय, NSQF अभ्यास क्रम, औद्योगिक प्रशिक्षण,स्वच्छता मॉनिटर, अंधश्रद्धा निर्मूलन, पुस्तक पेढी, वाचन उपक्रम, टाकाऊतून टिकाऊ, कौशल्य उपक्रम, तंबाखू मुक्त शाळा,विज्ञान प्रयोग, सांस्कृतिक उपक्रम, गणित शिक्षण यांसह अन्य उपक्रम वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन यासारखे सर्व निकष राबवून शाळेने तालुक्यात प्रथम येण्याची धडपड केली.या प्रयत्नांना यश आले व शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुख्याध्यापक डी.एन. निचळे व उपक्रमशील शिक्षक ए.के.शेख, पी.एस.नागटिळक,एम. एस.बिरादार, एस.एन.बिरादार, टी.डी.बिरादार,एस.एम.कांबळे, एम.एस.चौसष्टे,शिक्षिका एन. एस.जावरे,जे. एस.स्वामी, जी.के.शेटे.व तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष,सर्व सदस्य,गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक आणि येरोळवासी यांच्या प्रयत्नामुळे शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तरी तालुक्यातून कौतुक होत आहे.व शाळा पाहण्यासाठी तालुक्यातील इतर शाळा येत आहेत.माझी शाळा टप्पा दोन उपक्रमात आमच्या शाळेने विद्यार्थी प्रयत्नाने ,शिक्षक मार्गदर्शनाने,शालेय समिती व येरोळवासी यांच्या सहकार्यामुळे व्दितीय क्रमांक मिळवला.पण टप्पा तीन मध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळवू असे मुख्याध्यापक डी. एन.निचळे म्हणाले.
लातूर:-शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा दोनमध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.