येरोळ:- येरोळ येथील जिल्हा परिषद प्रशाला येरोळ शाळेच्या वतीने अष्टपैलू व्यक्तिमत्व, आदर्श शिक्षक पुरषकाराने सन्मानित,कृतिशील अध्यापन करणारे ,निष्ठावंत,प्रेमळ स्वभावाचे व विद्यार्थ्यांशी मनमिळाऊ वृत्तीने वागणूक देणारे शिक्षक शिवाजी बिरादार सर (अण्णा) यांचा सेवानिवृत्ती निरोप व परिवारासह सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे व नातेवाईक यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून स्वागताचा कार्यक्रम झाला.
सहवास सुटला म्हणून,
सोबत सुटत नाही…..
नुसता निरोप दिल्याने,
नाती तुटत नाही …….
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे व नातेवाईक यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून स्वागताचा कार्यक्रम झाला.
सहवास सुटला म्हणून,
सोबत सुटत नाही…..
नुसता निरोप दिल्याने,
नाती तुटत नाही …….
सरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा .
सरांना दीर्घायुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना
व माझ्या मनोगताला पूर्णविराम देतो.
धन्यवाद !!
असे बोलत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी महाराज दाडगे हे होते.तर प्रमुख पाहुणे तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री बळीराम चव्हाण सर,शिवाजीराव येरंडे ईश्वर बिरादार,अरुण बिरादार, तांदळे सर,बिरादार सर,अभय येरोळकर, अंतेश्वर बिरादार,तालुक्यातील इतर शिक्षक,शाळेतील शिक्षक, विद्यार्थी ,पालक, आणि ग्रामस्थांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.