संजय कचरुजी पारधी बल्लारपुर
भद्रावती ( ता . ) स्थानिक भद्रावती तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटना आणि चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या पुढाकाराने, भद्रावती तालुका बॉक्सिंग क्लब येथील खेळाडू ७ वे खासदार क्रीडा महोत्सव नागपूर बॉक्सिंग स्पर्धा दिनांक २२ जानेवारी ते २५ जानेवारी २०२५, सी.पी. अँड बेरार हायस्कूल रेशमबाग येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत भद्रावती तालुका बॉक्सिंग क्लब येथील बॉक्सर कांशित इंदुरकर, प्रणाली बदखल, तन्वी कुटेमाटे, सिद्धी आमने या खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केले तसेच रिद्धी आमने, आरुषी बेतावार, महेश आडे, कार्तिक आडे यांनी रजत पदक प्राप्त केले. याचप्रमाणे भद्रावती तालुका बॉक्सिंग क्लब येथील खेळाडू कांशित इंदूरकर याला या स्पर्धेतील बेस्ट बॉक्सर म्हणून सन्मानित करण्यात आले आणि महेश आडे याला बेस्ट चॅलेंजर म्हणून सन्मानित करण्यात आले. भद्रावती तालुका बॉक्सिंग क्लबला मिळालेले पदक आणि सन्मान हा भद्रावती शहरा करता अलौकिक आहे. भद्रावती शहरातील बॉक्सिंग खेळाडूंच्या यशाबद्दल चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर , भद्रावती तालुका क्रीडा संकुल समितीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रिय आमदार करण देवतळे, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र, राजेश भांडारकर, तहसीलदार भद्रावती, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जयश्री देवकर, तालुका क्रीडा अधिकारी भद्रावती, विजय डोबाळे, बॉक्सिंग राज्य क्रीडा मार्गदर्शक, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सर्व पदाधिकारी, भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक लता इंदूरकर व रोहन मोटघरे, फाउंडर अध्यक्ष डॉ. बी. प्रेमचंद अध्यक्ष डॉ. राकेश तिवारी, प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे, ऍडव्होकेट मिलिंद रायपुरे, सुनिता खंडाळकर, अमर भंडारवार, नेहाल डांगे, पूर्वा खेरकर, वर्षा कोयचाळे, डॉ. दिलीप बगडे, डॉ. मला प्रेमचंद, डॉ. अमित प्रेमचंद, राज मोहुर्ले, कृष्णा रामटेके, प्रियंका मांढरे यांनी खेळाडूंचे स्वागत सत्कार.