वंदे भारत लाईव टीव्ही न्यूज राजुरा
चिंचोली खुर्द :- वेकोलीच्या गोवरी पौनी खुल्या कोळसा खाणीत मागील दोन महिन्यापासून कार्यरत असलेल्या श्री बुद्धा माती कंपनीत स्थानिक बेरोजगार यांना काम देण्याऐवजी परकीय व्यक्तींना संधी दिली. त्यामुळे संतप्त बेरोजगार युवकांनी शिवसेना (उभाठा )गटाचे उपजिल्हा प्रमुख तथा एच एम एस कामगार युनियन चे महामंत्री श्री बबनभाऊ उरकूडे तसेच गोवरी ग्रामपंचायत च्या सरपंच आशा उरकुडे यांच्या नेतृत्वात मोर्च्या काढण्यात आला. यात असंख्य बेरोजगार सामील झाले होते.
या मोर्च्यात स्थानिक बेरोजगार यांना 80%कंपनीत रोजगार द्यावा अशी मागणी श्री बुद्धा माती कंपनी कडे श्री बबनभाऊ उरकुडे यांच्या मार्फत करण्यात आली. जर 80% स्थानिक बेरोजगारांना कंपनीत सामावून घेतले नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन कंपनिविरुद्ध करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.