A2Z सभी खबर सभी जिले कीपुणेमहाराष्ट्र

युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे पुण्यात पालखी निमित्त 5000 हरिपाठ वाटप

IMG 20250621 WA0035युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पुणे पदाधिकारी पत्रकार-संजय धर्मे, पत्रकार गणेश तारु, पत्रकार रितेश सणस यांचेकडून पुण्यात पालखी निमित्त 5000 हरिपाठ वाटप करण्यात आले. वारकऱ्याशी संवाद साधत विचारपूस करण्यात आली. युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सामजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते, वेळोवेळी अनेक उपक्रम यांच्या वतीने राबविण्यात येतात. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही सामजिक बांधिलकी जपून सर्व टीम सहित नेहमी आम्ही सामजिक कार्य कुठलेही असो त्यात आम्ही भाग घेत असतो व तसेच कुणालाही कुठे काहीं शासकीय मदत असेल किंवा कुणावर अन्याय झाल्यास आम्ही व आमची टीम लगेच तात्काळ नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घेण्यात येतो. राष्ट्रिय अध्यक्ष गणेश कचकलवार यांचा नेहमी आम्हाला पाठींबा असतो कुठेही काही अडचणी आल्यास तात्काळ आम्ही एक मताने एक जुट होवून पुढाकाराने कार्य हाती घेतो. आम्हाला मार्गदर्शक पश्चिम महाराष्ट्र सचिव संतोष लांडे व पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख कांताबाई राठोड तसेच राज्य उपाध्यक्ष गणेश महाडिक व पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भालेराव यांचे सहकार्य नेहमी लाभत असते त्यामुळे आम्हाला एकजुटीने काम करण्यास खूप मदत होते. असे मत पदाधिकाऱ्यांना यावेळी विचारले असता सांगण्यात आले.

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!