A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

विजय बाबासाहेब गर्जे यांनी तक्रारदार यांचेकडुन पंचा समक्ष ३०,००० /- रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

Vijay Babasaheb Garje was caught red-handed while accepting a bribe of Rs. 30,000/- from the complainant in front of the Pancha.

दि.२०/०४/२०२५ अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग / घटक गुन्हा नोंद क्रमांक कलम आरोपीचे नांव व कार्यालय मागणी केलेल्या लाचेची रक्कम स्विकारलेली लाचेची रक्कम नाशिक / अहिल्यानगर पाथर्डी पो.स्टे., जि. अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ) आरोपी (खाजगी इसम ) विजय बाबासाहेब गर्जे, वय ४८ वर्ष, धंदा- शिक्षक व शेती, रा. पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर २,००,०००/- रुपयांपैकी पूर्वी १,५०,०००/- रुपये स्वीकारलेले आहेत उर्वरीत ५०,००० /- रुपयांची मागणी करुन ३०,००० /- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ३०,००० /- रूपये

थोडक्यात माहिती

प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, यातील तक्रारदार हे त्यांचे भावासह पान टपरी व शेतीचा व्यवसाय करतात. दि. ४/४/२०२५ रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनचे सपोनि व त्यांचे पथकाने तक्रारदार यांचे राहते घराच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये छापा टाकून त्या ठिकाणी असलेली सुगंधी तंबाखू सुपारी व मावा तयार करण्याचे साहित्य जप्त केले होते. सदरची कारवाई सुरु असतांना तक्रारदार यांना त्यांचे ओळखीचे इसमाने खाजगी इसम गर्जे यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार हे खाजगी इसम गर्ने यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना म्हटले की, तुझ्या भावावर मोठया कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करावयाचा नसेल आणि तुला तपासात मदत हवी असेल तर तुला सपोनि यांचे करीता दोन लाख रुपये दयावे लागतील. त्यावेळी तक्रारदारांनी गर्जे यांच्या ओळखीच्या इसमाच्या मोबाईलवर ऑनलाईन पध्दतीने स्वतःच्या अकाऊंटवरुन ५० हजार रुपये व नातेवाईकांच्या अकाऊंटवरुन एक लाख रुपये असे दिड लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर दि. १५/०४/२०२५ रोजी तक्रारदार यांनी गर्जे यांना फोन करुन भावाचे अटकपूर्व जामीन संबंधित विचारले असता त्यांनी सपोनि साहेबांना उर्वरित पन्नास हजार रुपये देऊन टाका व विषय मिटवून टाका असे म्हटले आणि जर तुम्ही पैसे नाही दिले तर सपोनि तुमच्या भावाचा अटकपूर्व जामीन मंजूर होऊ देणार नाहीत व त्याला अटक करतील असे बोलले. तक्रारदार यांची लाच देण्याची | इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सपोनि व आरोपी खाजगी इसम यांच्याविरुध्द लाच मागणीची तक्रार नोंदविली होती.

सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.१६/४/२०२५ रोजी तक्रारदार यांना त्यांचे तक्रारीप्रमाणे पंचासह खाजगी इसम यांचेकडे पडताळणी करीता पाठविण्यात आले होते परंतु त्यांनी कोर्टाने ‘से’ ची मागणी केल्यानंतर भेटावयास या असे सांगितले होते. दि.१९/४/२०२५ रोजी तक्रारदार यांना पंचासोबत तक्रारदार यांच्या तक्रारी प्रमाणे खाजगी इसमासह सपोनि पो.स्टे. पाथर्डी यांचेकडे पडताळणी करीता पाठविण्यात आले होते परंतु सपोनि यांनी लाचेची कोणतीही स्पष्ट मागणी केलेली नाही परंतु सपोनि हे त्या ठिकाणावरुन इतरत्र गेल्यानंतर खाजगी इसमाने तक्रारदाराकडे सपोनि यांचे करीता उर्वरीत ५०,०००/- रुपयांची मागणी करुन त्यापैकी ३०,००० /- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. आज दि.२०/४/२०२५ रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी (खाजगी इसम) विजय बाबासाहेब गर्जे यांनी तक्रारदार यांचेकडुन पंचा समक्ष ३०,००० /- रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

अजित त्रिपुटे) पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर

Back to top button
error: Content is protected !!