A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*नवी मुंबईत नागरी विकास, रोजगार, आणि पायाभूत सुविधांना बळ*

*नवी मुंबईत नागरी विकास, रोजगार, आणि पायाभूत सुविधांना बळ*

           प्रेस विज्ञप्ति 
        वर्षा निवासस्थान, मुंबई 

नवी मुंबईत नागरी विकास, रोजगार, आणि पायाभूत सुविधांना बळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी नवी मुंबई महानगरपालिका व ऐरोली विधानसभा मतदारसंघातील समस्या, विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजनांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी नवी मुंबईतील नागरिकांसाठी आवश्यक नागरी सुविधा, विकास आराखडा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच स्थानिक गरजांवर आधारित घरे अधिकृत करण्यासंदर्भातील बाबींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला.

नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी देणे, होर्डिंग व फेरीवाला धोरणावर तात्काळ निर्णय घेणे आणि करारपद्धतीने काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना बारवी धरणग्रस्तांच्या धर्तीवर कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी वेळबद्ध योजना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मोरबे धरण व सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, सिडको गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती कमी करणे, शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करणे, गावठाण विस्तारात गरजेपोटी बांधलेल्या घरांना अधिकृत करणे, स्थानिक तरुणांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून देणे, दगडखाण व क्रशर प्लॉटधारकांना पुनर्वसन म्हणून भूखंड देणे यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

खारघर ते नेरूळ सागरी मार्गाच्या रेषेचा फेरविचार करून बेलापूर सेक्टर 11 मधून विमानतळाशी जोडण्याचा पर्याय विचाराधीन ठेवणे, याशिवाय बेलापूर सेक्टर 15 येथे डबल डेकर रस्त्याची शक्यता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तुर्भे व कोपरखैरणे दरम्यान खैरणे गावाजवळ नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार कपिल पाटील, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई महापालिका आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Vande Bharat live tv news,Nagpur 
            Editor 
Indian council of Press,Nagpur 
          Journalist 
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat 
no.201,Harmony emporise Payal - 
pallavi society new  Manish Nagar- 
Somalwada-440015
Back to top button
error: Content is protected !!