उल्हासनगर:- आज दिनाक – २८/२/२०२४ रोजी उल्हासनगर मधील पाणी पुरवठा समस्या बाबत उद्योग मंत्री नामदार श्री उदय सामंत यांच्या मंत्रालयीन दालनात आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाणजी , खासदार डॉ श्रीकांत शिंदेजी, १४१ उल्हासनगर विधानसभा आमदार श्री कुमार आयलानीजी, अंबरनाथ विधानसभा आमदार डॉ बालाजी किणीकरजी मुरबाड प्रधान सचिव उद्योग विभाग,प्रधान सचिव उद्योग विभाग, प्रधान सचिव जलसंपदा विभाग,मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी,माजी नगरसेवक लाल पंजाबी , डॉ प्रकाश नाथानी, टोनी सिरवाणी, सिंधी साहित्य आकादमी कार्याध्यक्ष महेश सुखरामाणी, टोनी सिरवाणी , शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरुण अशाण, राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड, बिटू कलवंत सिंह सहोता,तसेच विविध विभागाचे अधिकारी हजर होते. या वेळी आमदार कुमार आयलानी यांनी शहराला अतिरिक्त ५० एमएल डी पाणी पुरवठा वाढविण्याबाबत एमआयडीसी आणि जलसंपदा विभाग यांची सयुक्त बैठक मा उपमुखमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दालनात बैठक आयोजित करने तसेच फॉरेस्ट नाका येथील शहराला देण्यात येणाऱ्या १० एमएलडी वरून १५ एमएलडी पर्यंत पाणी पुरवठा पर्यंत वाढविणे आदि विविध मागण्या मा उद्योग मंत्री यांच्या कडे या वेळी करण्यात आल्या.
या वेळी मा उद्योग मंत्री यांनी उल्हासनगर शहराला तात्पुरता स्वरुपात १० एमएलडी पाणी वाढवून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याना दिले
2,503 Less than a minute