
प्रेस विज्ञप्ति
मंत्रालय, मुंबई
'ई-मंत्रिमंडळ’ उपक्रम: एक डिजिटल क्रांती💻
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे ‘ई-मंत्रिमंडळ : कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल’ या उपक्रमांतर्गत पहिलीच ई-मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आणि डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी ‘ई-मंत्रिमंडळ’ उपक्रमाची सुरूवात केलेली आहे. या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी होऊन डिजिटल माध्यमातून सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवता येणार आहे. ‘ई-मंत्रिमंडळ’ प्रणालीद्वारे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन, संदर्भ शोध, निर्णयांची अंमलबजावणी आणि परीक्षण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुलभतेने करता येईल.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
Vande bharat Live tv news nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015