A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*11 नोव्हेंबर कर्मचारी शिक्षक महाराष्ट्र भर आंदोलन करणार.*

*11 नोव्हेंबर कर्मचारी शिक्षक महाराष्ट्र भर आंदोलन करणार.*

*प्रसिध्द पत्रक*
नागपूर

*राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र*

दिनांक 8 नोव्हेंबर 2025

*11 नोव्हेंबर कर्मचारी शिक्षक महाराष्ट्र भर आंदोलन करणार.*

सरकारी व निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जिल्हातील सर्व कार्यालयासमोर दुपारी भोजन सुट्टीत दोन तास धरणा नारे निर्देशने करण्यात येणार आहे.या आंदोलनाची सरकारने दखल घेऊन प्रश्न सोडवले नाही तर हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा निर्णय समन्वय समिती महाराष्ट्र च्या वतीने घेतला आहे. या समितीत १७ लाखांहून अधिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीचा समावेश आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन अधिसूचना काढने,कंत्राट कर्मचा-यास नियमित करणे,रिक्त जागा भरणे या व ईतर मागण्या सरकारकडे वारंवार मागणी करून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
यामुळे कर्मचारी,शिक्षक संतप्त झाले आहेत. संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईच्या कामात कर्मचारी व्यग्र आहेत. यामध्ये व्यत्यय नको म्हणून कर्मचाऱ्यांनी संप रद्द करून निदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य अध्यक्ष अशोक दगडे,निमंत्रक, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, सघटक लिलाधर पाथोडे यांनी दिली.

ज्ञानेश्वर महल्ले
उपाध्यक्ष

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!