A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बौध्द समाज संवाद दौरा निमित्त बैठक संपन्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बौध्द समाज संवाद दौरा निमित्त बैठक संपन्न

प्रेस नोट
प्रतिनिधि नवी मुंबई
डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बौध्द समाज संवाद दौरा निमित्त बैठक संपन्न.
दि. २६ – बौध्द समाज संवाद दौरा निमित्त आयोजित बैठक सायं. ६ वा.
स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर मुंबई येथे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांचे उपस्थीती मध्ये पार पडली.
संवाद दौऱ्या साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस. के. भंडारे (केंद्रीय उपाध्यक्ष)भारतीय बौध्द महासभा, यु.जी. बोराडे (राज्य अध्यक्ष)भारतीय बौध्द महासभा, राजेंद्र पातोडे (प्रदेश युवा महासचिव), अमित भुईगळ (प्रदेश सदस्य), स्वातीताई शिंदे(राज्य महिला प्रमुख),भारतीय
बौध्द महासभा, महेंद्र रोकडे(मुंबई समन्वयक),वंचित आघाडी ह्याची होती तर प्रमुख उस्थिती मध्ये परमेश्वर रणशुर
( मुंबई प्रदेश अध्यक्ष)वंचित युवा आघाडी,सूनिताताई गायकवाड
(मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष)वंचित महिला आघाडी, शिल्पाताई रणदिवे नवी मुंबई महिला अध्यक्ष आदी मान्यवर होते.बैठकीचे संचालन आनंद जाधव (प्रदेश महासचिव)वंचित आघाडी मुंबई ह्यांनी प्रास्ताविक महेंद्र रोकडे यांनी केले.
बैठकीत एस. के. भंडारे, यु. जी. बोराडे, अमित भुईगळ, स्वातीताई शिंदे ह्यांनी मार्गदर्शन केले तर पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उकल राजेंद्र पातोडे ह्यांनी केली.सदर बैठकीस वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार, विद्वत सभा, भारतीय बौध्द महासभा – समता सैनिक दल आणि बौध्द महासभा महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी, जिल्हा तालुका आणि वॉर्ड शाखा पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई – नवी मुंबई मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५

Back to top button
error: Content is protected !!