राजुरा – राजुरा तालुक्यातील गोवरी गावातील नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी गावात गोंधळ करत ग्रामपंचायत सचिव च्या कारभारला कंटाळून 30 नोव्हेंबर ला कार्यालयाला कसल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी घुमे यांनी श्यासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून माजी सभापती, माजी सरपंच यांच्यासाह गावातील 17 जणांवर गुन्हा दाखल केला असता आरोपीवर कलम 126(2),221,अन्वये कार्यवाही राजुरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पारखी यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही सुरु आहे.