संजय पारधी चंद्रपुर महाराष्ट्र
भद्रावती : विवेकानंद महाविद्यालयातील कुमारी रितिका बोस वर्ग 12 वा विज्ञान या विद्यार्थिनींचे महाराष्ट्र शासन क्रीडापीठ अंतर्गत बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनी येथे निवड झाली. या बॉक्स या विद्यार्थिनीने गतवर्ष झालेल्या महाराष्ट्र शासन शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाचे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे तसेच नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करत रजतपदक प्राप्त करून संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयाचे आणि भद्रावती शहराचे नावलौकिक करत यावर्षी तिने महाराष्ट्र शासन क्रीडापीठ अंतर्गत बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे आपले स्थान पक्के केले. महाराष्ट्र शासन क्रीडा पेठ क्रीडा प्रबोधिनी हे महाराष्ट्रातील उच्चत्तम खेळाडूंची निवड करून त्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करतात या प्रशिक्षणा दरम्यान संपूर्ण खेळाडूचा आर्थिक भार महाराष्ट्र शासन स्वतः करतात. अश्या या क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेणारी कुमारी रितिका बोस हि भद्रावती शहरातील प्रथम बॉक्सिंग खेळाडू ठरली. रितिका बोसची क्रीडा प्रबोधिनीत निवड होणे हे भद्रावतीचा उच्चतम मान आहे. रितिका बोस हिने आपली बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे निवडीचे श्रेय आई वडील, महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर.बांबोडे, भद्रावती येथील बॉक्सिंग प्रशिक्षिका सौ. लता इंदूरकर यांना दिले. महाराष्ट्र शासन क्रीडापीठ अंतर्गत बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे रितिका बोस ची निवड झाल्याबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमनभाऊ टेमुर्डे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. डॉ. राखुंडे, प्रा. डॉ. घुमे, प्रा. डॉ. पारेल्लवार, प्रा. डॉ. सावे, प्रा. डॉ. तेलंग, प्रा. डॉ. खामनकर, प्रा. डॉ. काकडे, प्रा. ठाकरे, डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. राकेश तिवारी, एडवोकेट मिलिंद रायपुरे, डॉ. दिलीप बगडे, श्री विजय लांबट, श्री दिलीप मोडक, प्रा. मालेकर, प्रा. लांबट, प्रा. कापगते, प्रा, दाते, प्रा. बैरम, प्रा. खोके, प्रा. बेलगावकर, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, भद्रावती तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.