समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित, न्यायपालक मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनेक वर्षापासून चालू असलेल्या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारी प्रवृत्ती उपडून काढून संविधानाचा आदर करीत शाहू, फुले, आंबेडकर च्या महाराष्ट्रात शिक्षणाचे धोरण सर्वसमावेशक व संविधानाच्या चौकटीत राबवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूलचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्र हे भ्रष्टाचारी अधिकारी, शिक्षण संस्थाचालकांच्या हातातील बाहुले बनवून राहिले आहे असे सर्वसामान्य जनतेच मत होत आहे.
शिक्षण क्षेत्रात नोकरीला लागण्याकरिता शिक्षकाला लाखो रुपये संस्थाचालकांना मोजावे लागतात, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता संस्थाचालक मोठाल्या रकमेचे डोनेशन घेतात, प्रायव्हेट संस्थेमध्ये शिक्षण शुल्कlच्या नावावर भरमसाठ फी आकारण्यात येते व तसेच तेथील शिक्षकांना अल्प वेतनात काम करून घेतल्या जाते, त्यांना पीएफ ग्रॅच्युइटी महिलांना बाळंतपण रजा वेतनासह व इतर सुविधा दिल्या जात नाही .
हा सर्व प्रकार महाराष्ट्राला अपमानित करण्याचा असून शाहू, फुले, आंबेडकर च्या महाराष्ट्राला अशोभनीय आहे.
कॉन्व्हेंट शाळेतील संस्थाचालक खुलेआम संविधानाचा गैरवापर करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे शोषण करीत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने यासंदर्भात अनेक निवेदने व आंदोलने केली. मोर्चे धरणे आंदोलन भजन आंदोलन या प्रकारच्या लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केले. परंतु त्याचा काही उपयोग होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की त्यांनी जातीने लक्ष घालून बिघडलेलि शिक्षण व्यवस्था योग्य मार्गावर आणून संविधानाचा आदर राखावा.अशी मागणी श्री विवेक आंबेकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग यांनी केली आहे .
2,510 Less than a minute