fbpx
A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगाराकडुन दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुस  जप्त

रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगाराकडुन दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुस  जप्त.

 

पुणे वंदे भारत लाईव्ह न्यूज राजू बावडीवाले तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर पोलीस अंमलदार केकाण, पोलीस तारु, ओलेकर, क्षीरसागर, पाटील असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार/ आण्णा केकाण, राहुल ओलेकर, व विनायक मोहीते यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे बाळु ढेबे यांचेकडे गावठी पिस्टल असुन तो स्वामीनारायण मंदीर ते तक्षशिला सोसायटीकडे जाताना चे व्हीजन स्कुलचे पाठीमागील रोडवर न-हे, पुणे येथील सर्व्हिस रोडवर थांबलेला आहे अशी बातमी मिळाली असता लागलीच त्यानी सोबतचे पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता त्यांनी ती वरिष्ठांनी कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करण्याचे आदेश दिले

सदर आदेशाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, व स्टाफ असे खाजगी वाहनामधुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता ओळखत असलेला व पोलीस रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी बाळु ढेबे हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला त्याची व आमची नजरा नजर होताच तो त्या ठिकाणावरुन आमची नजर चुकवुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच वरील स्टाफचे मदतीने काही अंतरावर त्यास पकडुन त्यास नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता बाळु धोंडीबा ढेबे वय-२७ वर्षे रा. राम मंदिर जवळ जनता वसाहत पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्यांने आम्हांस उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशानेच थांबला असल्याची आमची खात्री झाल्याने लागलीच पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ ८०,०००/- रु किं. चे दोन गावठी पिस्टल व २,०००/- रु. किं. चे दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परी. ३. पुणे श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड

विभाग श्री. अजय परमार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर,यांच्या पथकाने केली.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!