A2Z सभी खबर सभी जिले की

जिल्हाधिका-यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद, भद्रावती येथील विजासन शाळेला भेट


सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत वरिष्ठ अधिका-यांनी गावात भेटी देऊन शाळा, आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी आदींची पाहणी करावी तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, अशा सुचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भद्रावती येथील विजासन शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

यावेळी वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथचंद्र दोन्तुला, भद्रावतीचे तहसीलदार श्री. भांडारकर, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शेळकी मॅडम, भद्रावती केंद्राचे केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी शाळेतील ऍस्ट्रॉनॉमी लॅबची विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून जीवनात यश प्राप्त करावे. कठोर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील. त्याची चांगली तयारी करावी. तसेच शिक्षणासोबतच आपल्यातील कलागुणसुध्दा विकसीत करावे. यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेतील परस बागेची पाहणी केली तसेच शाळा, शालेय परिसर या सर्व बाबीविषयी समाधान व्यक्त केले.

या भेटीच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ भाऊ दानव, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पेंदा, सहायक शिक्षक अमोल व-हाडे, जीवने मॅडम, चांदेकर मॅडम, डोंगरे मॅडम, सुरज उमाटे, दीपक कावटी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!