A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

शेतात चरायला सोडलेल्या दोन बैलांचा आकास्मित मृत्यू

केशव काळे यांचे शेतीचा हंगाम चालू असताना ते आर्थिक संकटात ओढवले

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा

राजुरा :- राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील शेतकरी केशव काळे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीचे बैल शेतात चरायला सोडले असता, चरायला सोडलेल्या बैलांना दुपारच्या वेळेस पाणी पाजाण्यासाठी टाक्यावर आणले.

पाणी पाजल्यावर काही वेळाने एका बैलाला थरकाप सुटला असता त्याला कसेबसे बैलबंडी जवळ आणण्यात आले. तेवढ्यात दुसरा बैल पण तसाच करायला लागल्याने घाबरलेल्या त्यांच्याच मुलगा कार्तिक काळे यांनी आरडाओरड केली असता शेता जवळील शेतकरी चंपत बोरकुटे आणि इतर शेतकरी मदतीला धावून आले. आणि  उपचार डाक्टरांच्या सल्याने चालू केले.घाबरलेल्या मुलाने बाहेरगावी गेलेल्या वडिलांना ही बातमी सांगताच वडील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही उपचार केले असता, त्यांच्या हाताला यश लाभले नसल्याने दोनही बैलांचा तडफडून सायंकाळी 4.00 वाजता जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनला माहिती देऊन गुन्हा नोंदविण्यात आला असता, तात्काळ पोलिसांनी घटना स्थळाला भेट दिली आणि पुढील कार्यवाही चालू आहे.

Back to top button
error: Content is protected !!